Notification

Last Updated: No updates
  • No notifications available.

Recruitment

Last Updated: No updates
  • No recruitments available.

Tenders

Last Updated: No updates
  • No tenders available.

आमच्याविषयी

इतिहास

पुण्यातील प्रभात स्टुडिओच्या आवारात १९६० मध्ये फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या नावाने स्थापन झालेल्या एफटीआयआयला सिनेमातील दर्जेदार शिक्षणाचा समृद्ध वारसा लाभला आहे. चित्रपट आणि दूरचित्रवाणीचे प्रशिक्षण एकत्र आणून ७० व्या दशकाच्या सुरुवातीला नवी दिल्लीत असलेली टेलिव्हिजन विंग पुण्यात स्थलांतरित करण्यात आली. १९७१ मध्ये संस्थेचे नाव बदलून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असे करण्यात आले. सुरुवातीच्या काळात दूरचित्रवाणी शाखा प्रामुख्याने दूरदर्शनच्या कर्मचार्यांना सेवाकालीन प्रशिक्षण देण्याशी संबंधित होती. तथापि, गेल्या काही वर्षांत, ही एक संपूर्ण शैक्षणिक शाखा म्हणून विकसित झाली आहे, जी कोअर स्पेशलायझेशनसह दूरचित्रवाणी मधील सखोल अभ्यासक्रम उपलब्ध करून देते.


लेनसाईट

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे शैक्षणिक नियतकालिक लेन्साइट मध्ये, समकालीन सिनेमा, सिनेमाचा इतिहास आणि सौंदर्यशास्त्रावर चर्चा व लेख, तसेच डिजिटल तंत्रज्ञान चलचित्र मध्यमांवर कक्ष प्रकारे परिणाम करत आहे यावर चर्चेचा समावेश असतो.लेन्साइटचे दर तिमाही प्रकाशन होते.

प्रभात संग्रहालय

२००१ मध्ये एफटीआयआय परिसरात स्थापन झालेले प्रभात संग्रहालय हे एफटीआयआयमध्ये आल्यावर आवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण आहे. परिसरातील सध्याच्या उपक्रमांव्यतिरिक्त, १९३१ मध्ये झालेल्या स्थापनेपासून प्रभात फिल्म कंपनीचा इतिहास आणि वारसा येथे अनुभवता येतो. ऐतिहासिक प्रभात स्टुडिओच्या मूळ इमारतीत असलेले प्रभात संग्रहालय १००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले असून चार दालनांमध्ये विभागलेले आहे...

रेडियो एफ टी आय आय

२९ जानेवारी २००७ रोजी रेडिओ एफटीआयआय ९०.४, या कम्युनिटी नभोवाणी केंद्राचे उद्घाटन झाले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या कम्युनिटी रेडिओ धोरणानुसार सुरू झालेले रेडिओ एफटीआयआय हे पहिल्या अर्जदारांपैकी एक होते. कम्युनिटी रेडिओने १ जून २००६ पासून प्रायोगिक तत्वावर प्रसारण सुरू केले व २९ जानेवारी २००७ पासून नियमित दैनिक प्रसारण सुरू झाले. यासाठी २००३ पासून आम्ही समुदाय, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना सहभागी करून आमची प्रोग्राम बँक तयार करण्यास सुरुवात केली होती.

DOWN THE MEMORY LANE

OUR ILLUSTRIOUS ALUMNI

Film Wing

TV Wing

STUDENTS' FILMS

STUDENTS' FILMS - Visit our YouTube Channel

Social Engangement

Awards and Recognitions

हमें संपर्क करें

भारतीय फ़िल्म और टेलीविज़न संस्थान

विधि महाविद्यालय मार्ग,पुणे-411004

महाराष्ट्र राज्य, भारत

दूरभाष : +91 020-25580000