प्रशासकीय रचना
एफटीआयआय ही भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे आणि ती सन 1860 च्या सोसायटी नोंदणी कायद्यानुसार नोंदणीकृत आहे. एफटीआयआय सोसायटीचे नेतृत्व अध्यक्ष करतात, जे चित्रपट, दूरदर्शन, कला किंवा शैक्षणिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असतात.
गव्हर्निंग कौन्सिल (GC) ही सोसायटीच्या सदस्यांमधून निवडणुकीद्वारे स्थापन केली जाते आणि ती सर्व प्रमुख धोरणात्मक निर्णयांसाठी जबाबदार असते. ती अकादमिक कौन्सिल (AC) आणि स्टँडिंग फायनान्स कमिटी (SFC) यांची नियुक्ती करते, ज्या एफटीआयआयला शैक्षणिक आणि आर्थिक बाबींवर मार्गदर्शन करतात. अध्यक्ष हे GC, AC आणि SFC चे अध्यक्ष म्हणूनही कार्य करतात.
माजी अध्यक्षांमध्ये श्री श्याम बेनेगल, श्री मृणाल सेन, श्री अदूर गोपालकृष्णन, श्री महेश भट्ट, श्री गिरीश कर्नाड, श्री विनोद खन्ना, प्रा. यू.आर. अनंतमूर्ती, श्री सईद मिर्झा, श्री गजेंद्र चौहान, श्री अनुपम खेर, श्री बी.पी. सिंह आणि श्री शेखर कपूर यांचा समावेश आहे.
संस्थेचे संचालक हे संस्थेचे कार्यकारी प्रमुख असतात आणि ते संस्थेच्या धोरणे व कार्यक्रमांची अंमलबजावणी करतात. सध्या श्री धीरज सिंह हे एफटीआयआयचे संचालक आहेत.
| प्रशासकीय अधिकारी | शैक्षणिक अधिकारी |
|---|---|
|
श्री धीरज सिंह कुलगुरू |
श्री संदीप शहारे डीन (दूरदर्शन) |
|
श्री प्रतीक जैन, IIS नोंदणी अधिकारी |
श्री धीरज मेश्राम डीन (चित्रपट) |
|
श्री विजय खरात मुख्य लेखा अधिकारी |

